
रोवले आणि उंबरशेत येथे बॉक्साइड साठी खोदलेले खोल खड्डे नागरिकांसाठी धोकादायक
दापोली तालूक्यातील उंबरशेत तसेच रोवले या महसूली गावाच्या हद्दीत बॉक्साईट उत्खननाचे काम सन 2005 मध्ये सुरू झाले मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या या उद्योगामुळे उंबरशेत रोवलेचा परिसर पुर्णपणे भकास झाला आहे.बॉक्ससाईट खनिज मिळवण्यासाठी खोल उत्खननाची परवानगी नसतानाही जमिनीत 20 ते 25 फुटापर्यंत खोलवर जावून करण्यात आलेली खोदाई खनिज काढले. मात्र त्यानंतर पुन्हा खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे खड्डे आता येथील रहीवाशांना धोक्याचे झाले आहेत.
रोवले आणि उंबरशेत या महसुली गावातील अगदी निवासी रहीवाशाच्या भागातील हद्दीत बॉक्साईट खनीज उत्खनन करण्यात आले. उत्खननामुळे पूर्वी घनदाट असलेले जंगल पूर्णपणे नष्ट झाले. डोंगर उघडे बोडके झाले. प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न गंभीर बनला. बॉक्साईट खनिज उत्खनन करणा-या कंपनीला खनीकर्म विभागाकडून दिलेल्या शर्ती आणि अटींचा भंग झाला. खनीकर्म विभागाने खोदाईची घालून दिलेली मर्यादा उत्खनन करणारे पाळत नसल्याने येथील पाण्याची पातळी खोल जावून येथे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बॉक्साईट उत्खननामुळे सर्वत्र वाहून आलेल्या खडीसदृष्य खडशामुळे शेती नापिक बनली.
www.konkantoday.com