खेड-हुंबरी येथे वृद्धेवर कोयतीने वार करणार्याला अटक
खेड : खेड तालुक्यातील खालची हुंबरी येथे क्ष्ाुल्लक कारणावरून वृध्देच्या मनगटावर कोयतीने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद आनंदी गंगाराम निकम (वय 75, खालची हुंबरी, मराठी शाळेजवळ, खेड) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदी निकम या घरामध्ये असताना संशयित आरोपी विजय मधुकर कदम (खालची हुंबरी, खेड) हा त्यांच्या पडवीत आला. निकम यांना व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करत होता. यावेळी निकम म्हणाल्या, “तू माझ्या मुलीला का शिव्या देतोस? तुझी आई तिच्या मर्जीने माझ्या लेकीच्या घरी गेली आहे” असे बोलल्याचा राग मनात धरून विजय कदम याने निकम यांना शिवीगाळ व दमदाटी करत हातातील कोयतीने निकम यांच्या डाव्या मनगटावर वार केला. यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. याबाबतची तक्रार त्यांनी 23 एप्रिल रोजी खेड पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार विजय कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात करून अटक करण्यात आली.