दाभोळ येथील पाचवीत शिकणार्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या
दापोली : तालुक्यातील दाभोळ येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार 22 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आला. रूद्र विनायक पदुकले (वय 12, राहणार दाभोळ, टेमकरवाडी) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रूद्रने सायंकाळी आपल्या राहत्या घरी भालाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. सायंकाळी सातच्या सुमारास रूद्रची आजी लक्ष्मी विठ्ठल पदुकले हिला आपला नातू गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. रूद्रला दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा अधिक तपास दाभोळ पोलिस करत आहेत. बालकाने गळफास का लावून घेतला याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.