राज्य निवड चाचणीत उंच उडीत रत्नागिरीच्या शीतल पिंजरे हिला सुवर्ण
रत्नागिरी : पुणे येथे सुरू असलेल्या पुरूष व महिला राज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरीच्या शीतल पिंजरे हिने उंच उडीमध्ये सुवर्णपदक पटकावले. पुणे येथे 21 ते 23 एप्रिल या कालावधीत पुरूष व महिला राज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा 33 जणांचा संघ सहभागी झाला आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या उंच उडी स्पर्धेत रत्नागिरीच्या शीतल पिंजरे हिने 1.65 मीटर उंच उडी मारून सुवर्ण पदक पटकावले. शीतल रत्नागिरी पोलिस खात्यात कार्यरत आहे. या स्पर्धेत रत्नागिरी शीतल पिंजरे हिच्यासह 1.65 मी. उडी मारत यश मिळवले. शीतलच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.