दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील किनार्यांवर पर्यटकांची गर्दी
सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांनी कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलले हाेते गणपतीपुळेत रोज २१ हजार याप्रमाणे चार दिवसात ७० हजारांहून अधिक पर्यटकांनी गणपती मंदिरात जावून दर्शन घेतले. जिल्ह्यातील सर्वच किनारी भागात पर्यटकांचा राबता होता. त्यामुळे सुटीचे दिवस व्यावसायिकांना सुगीचे ठरले.
गुरूवारपासून शासकीय सुट्ट्यांना प्रारंभ झाला. सलग सुट्या आल्याने मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो पर्यटक कोकणातील किनार्यांकडे वळले होते. दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील किनार्यांवर पर्यटकांची गर्दी तिन्ही दिवस दिसत होती.
www.konkantoday.com