कोरोनाची चौथी लाट; रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना सतर्कतेच्या सूचना
रत्नागिरी : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचा आरोग्य विभागदेखील अॅलर्ट झाले आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना खबरदारी घेण्यासंदर्भातील पत्रक पाठविण्यात आले आहे. संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला अॅलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तपासण्यांचे प्रमाणही वाढवा अशाही सूचना आरोग्य विभागाकडून आल्याने खबरदारी घेतली जाणार आहे. रत्नागिरीत अद्यापही तशी परिस्थिती नाही. मात्र, खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण नसले तरी शासनाकडून आलेल्या आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे.