रत्नागिरीत जाणीव फाऊंडेशनतर्फे २६ रोजी ‘तिमिरातूनी तेजाकडे’ कार्यक्रम
रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या संस्थेतर्फे तिमिरातूनी तेजाकडे हा श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला आहे. स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाचे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
अध्यक्षा आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी वेगळी वाट निवडून अंध मुलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव अशा अंध शाळेची स्थापना केली. संस्थेचे उत्तम जैन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यासारखा सामाजिक भान जपणार्या व्यक्तिमत्त्वांनी स्नेहज्योतीची वाटचाल आणखी बळकट केली आहे.
दोन तासांची संगीत मैफल येथील विद्यार्थी सादर करणार आहेत. गायिका मनश्री सोमण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सिद्धाई फुड्स- आरोग्य मंदिर, हॉटेल वैशाली- बाजारपेठ, श्रावणी ग्राफिक्स- आरोग्य मंदिर, हॉटेल व्हेज ट्रीट- काँग्रेस भवन आदी ठिकाणी उपलब्ध आहेत.
*कार्यक्रमाचा निधी देणार अंध विद्यालयास*
या कार्यक्रमातून संकलित होणारा निधी हा स्नेहज्योती अंध विद्यालयास देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे (9422003128) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.