जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मिळणार मोफत गणवेश


जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश, स्काऊट गाईडचा गणवेश, बुट आणि दोन मोजे यासाठी शासनाकडून निधी देण्यात आला आहे. त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार शाळांमधील ६४ हजार २० विद्यार्थ्यांना लाभमिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेला प्रति विद्यार्थी ३०० रु. प्रमाणे कोटी १,९२,०६०० रु. अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे मोफत गणवेशाचा शाळेच्या पहिल्याच दिवशी लाभ दिला जाणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये होते. अनेकवेळा काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्यही मिळत नाही. प्राथमिक शाळांची पटसंख्या कायम रहावी, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पूर्वी शासनाकडून मुली आणि एससी, एसटी संवर्गातील मुलांना गणवेशाचा लाभ दिला जात होता. मात्र आता जि.प.च्या सर्वच मुलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये मुलींची संख्या ३१,८२७, एससी मुले २६७५, एसटी मुले ७००, बीपीएल मुले ६९८६ तर राज्य शासन लाभार्थी मुलांची संख्या २१,८३२ इतकी आहे. एकूण ४२ हजार १८८ आणि राज्य शासन लाभार्थी २१ हजार ८३२ अशा विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी शासनाकडून अनुदानही शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button