
पती-पत्नीच्या भांडणामधून धामणदेवीत विवाहितेची गळफासाने आत्महत्या
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक कामगार वसाहतीत वास्तव्यास असलेल्या ३८ वर्षीय विवाहितेने राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ मे रोजी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. खादीजा बीबी असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाल्यानंतर पतीने तिला मारले होते. यानंतर दोघे झोपले होते. मध्यरात्री १२.३० ते २.३० या वेळेत विवाहितेने नायलॉन दोरीने खोलीतील पत्र्यांच्या खालील लोखंडी खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com