कळंबणी वाळंजवाडी येथे तवेरा कार उलटून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी
खेड : मुंबईहून जयगडकडे जाणाऱ्या फुटाणे कुटुंबाच्या कारला कळंबणी वाळंजवाडी येथे अपघात झाला. तवेरा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरात कार उलटली. मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात एका कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. स्वाती विजय फुटाणे(वय ४६), किरण विजय फुटाणे(वय २७), रश्मी रवींद्र मालगुडे (वय ३७), विजय मारुती फुटाणे(वय ५१), राजेश गणेश कहारे(वय ३५) व काजल विजय फुटाणे (वय २५, सर्व रा.बोरिवली) हे प्रवास करत होते. घटनास्थळी मदत ग्रुपच्या स्वयंसेवकांनी मदत केली. या अपघातातील जखमी प्रवाशांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे.