धामणी येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

धामणी येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथील ड्रायव्हिंग हॉटेलसमोर दुचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार नितीन अनंत मेस्त्री (वय 45 धामणी सुतारवाडी ) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून (एम एच 14. 1461 ) संगमेश्वर धामणी कडे जात होता. पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना त्याची धडक समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोला नंबर (एमएच 08. ए पी 1781) बसली. हा अपघात इतका गंभीर होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नरेंद्रचार्य महाराज संस्थानची ॲम्बुलन्स बोलवण्यात आली. त्यावेळी चालक गुरुप्रसाद नागवेकर व त्याचा मित्र सौरभ फटकरे व काशिनाथ फेफडे यांनी नितीनला त्वरित हॉस्पिटलला नेले. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button