रेशन दुकानात आता स्टेशनरीही मिळणार!

रेशन दुकाने आता बहुउपयोगी वस्तू भांडार होणार असून शालेय साहित्य (स्टेशनरी) विकण्याचीही परवानगी राज्य सरकारने दुकानदारांना दिली आहे. त्यामुळे आता शिधावाटप धान्य व वस्तूंपेक्षा अन्य साहित्य अधिक ठेवले जाणार आहे.
शिधावाटप दुकानदारांनी वर्षभरापूर्वी कमिशन वाढवून देण्याची मागणी रेटली होती. शिधावाटप धान्य व वस्तू विकून पुरेसे उत्पन्न किंवा नफा मिळत नसल्याने खुल्या बाजारातील धान्य विक्रीची मागणी करण्यात आली होती. ती पूर्वीच मान्य झाली. त्यानंतर दूध, भाजीपाला, बि-बियाणे आदींच्या विक्रीसही मान्यता देण्यात आली. तरीही पुन्हा शालेय सााहित्य विकण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह राज्यभरातील दुकानदारांनी काही महिन्यांपासून धरला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button