शिरगाव येथील वायरमनचा शॉक लागून मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील अग्निशमन दल इमारतीजवळ असलेल्या महावितरण कंपनीच्या डिपीवर काम करणार्‍या कर्मचार्‍याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. अक्षय अशोक फूटक (22, रा. शिरगाव-आडी, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. अक्षय हा महावितरण कंपनीमध्ये कामाला होता. सोमवारी सकाळी अक्षय एमआयडीसी येथील महावितरणच्या डीपीवर काम करत असताना अचानकपणे त्याला शॉक लागला. त्याच्या सहकार्‍यांनी त्याला तातडीने साळवी स्टॉप येथील खासगी रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेे असता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button