
जल शक्ती अभियान अंतर्गत ‘Catch the Rain -2022’ मोहिमेचा शुभारंभ
जल शक्ती अभियान अंतर्गत ‘Catch the Rain -2022’ मोहिमेचाशुभारंभ दि.29/03/2022 रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती यांचे शुभहस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी दृकश्राव्य माध्यमाद्वारे (VC)मा.डॉ.इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी, मा.श्री.परिक्षित यादव, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी हे उपस्थित होते.
सदर मोहिम ही रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दि.29 मार्च ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ‘Catch the Rain -2022’ मोहिमे अंतर्गत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 1 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन यामध्ये जल शपथ घेणे, जनजागृती करणे, पाऊस पाणी संकलन करणे, पाणी स्त्रोतांची गणना करणे, पारंपरिक पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण, बंद असणारे पाणी स्त्रोत नव्याने सुरु करणे व पुनर्वापर, पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, हरित क्षेत्र वाढविणे अशा अनेक विषयी ग्रामस्थाचा लोकसहभाग घेऊन ‘Catch the Rain -2022’ मोहिम यशस्वी करावी असे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे (VC) उपस्थित जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक यांना याविषयी मा.डॉ.इंदूराणी जाखड यांनी मार्गदर्शन केले.
तसेच श्रीक्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गणपतीपुळे, चाफे व देऊड गावांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन व व शुभारंभ पर्यटन व पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.श्री.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘Catch the Rain -2022’ मोहिमे अंतर्गत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जल शपथ घेण्यात आली.
यावेळी मंत्री परिवहन व संसदीय कार्य तथा पालकमंत्री मा.ॲड.अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री.उदय सामंत, मा.खासदार श्री.विनायक राऊत, मा.आमदार श्री.भास्करराव जाधव,मा.आमदार श्री.राजन साळवी, मा.आमदार श्री.दिपक केसरकर, माजी आमदार मा.श्री.रविंद्र माने, मा.जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
