रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन , सन 2021 – 22 चा पदग्रहण सोहळा, पदग्रहण अधिकारी, रोटे. नासीरजी बोरसदवाला,रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी, यांच्या शुभहस्ते पार पडला. या रोटरी वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून रोटे.संजीवजी सुर्वे , सेक्रेटरी रोटे.हिराकांतजी साळवी , ट्रेझरर रोटे. बिपीनचंद्रजी गांधी यांची निवड करण्यात आली. या पदग्रहण सोहळयाचे प्रसंगी, क्लब सदस्यांचे मित्रपरिवारापैकी डॉ.स्वप्न संदीप खरे, *श्री.ओंकार* *भाटकर* , *सौ.स्मिता* *जयंतीलाल* *जैन* , यांना क्लबचे सदस्यत्व व रोटरी पिन बहाल करण्यात आली. क्लब तर्फे प्रतिवर्षी प्रकाशित होणाऱ्या *रत्नांकूर* या अंकाचे प्रकाशन देखील पदग्रहण अधिकारी नासीरजी यांचे हस्ते या प्रसंगी करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊन या क्लबला यापूर्वीच 100% PHF क्लब, असा सन्मान प्राप्त झालेला आहे.सदर क्लब सदस्यांपैकी माजी असीस्टंट गव्हर्नर *रोटे.समीरजी* *इंदुलकर* व त्यांच्या सुविद्य पत्नी *सौ. श्रेया* *इंदूलकर* यांना सन 2020 - 2021 मध्ये मेजर डोनर हा मानाचा किताब रोटरीतर्फे बहाल करणेत आला असल्याने तसेच क्लबचे सदस्य *रोटे.राजेंद्रजी* *कदम* *उर्फ* दादा यांना व नुतन खजिनदार *बिपीनचंद्रजी* *गांधी* यांना PHF (Poul Harris Fellow) हा किताब बहाल करणेत आला असल्याने पदग्रहण अधिकारी नासीरजी यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, क्लब तर्फे बळीराम परकर हायस्कूल मालगुंड, यांना *ई* *-* *लर्निंग* सुविधेकरीता *लॅपटॉप* प्रदान करण्यात आला. तसेच कोवीडजन्य ,तोक्ते वादळजन्य व पाऊस परिस्थितीत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सर्व कामगार वर्गाने, रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात,विद्युत पुरवठा अत्यंत चांगल्या प्रकारे कमीत कमी कालावधीमध्ये, प्रसंगी पाऊस पाण्यामध्ये, दिवस-रात्र उपस्थित राहून,काम करून सुरळीत केला, त्याबाबत, प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे,अभियंता *श्री.रामेश्वर* *नारायण* *बोबडे* व प्रधान तंत्रज्ञ *श्री*.*रामचंद्र* *यल्लाप्पा* बडगे ** यांचा पदग्रहण अधिकारी नासीरजी बोरसदवाला यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी,रत्नागिरी नाचणे रोड येथील *प्रवासी* *निवारा* *शेडचे* नुतनीकरण, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन तर्फे करण्यात आले. नुतनीकरणानंतर रोटरीचे पदग्रहण अधिकारी रोटे.नासीरजी यांच्या शुभहस्ते या प्रवासी बसशेड चे उद्घाटन क्लबचे नुतन अध्यक्ष रोटे.संजीवजी सुर्वे व क्लब सदस्यांचे उपस्थित पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button