
रत्नागिरीचा बांधकामाविना ठप्प पडलेला एसटी स्टँड हे महाआघाडी शासनाच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीच प्रतीक -दीपक पटवर्धन
निद्रिस्थ सत्ताधीशना जागृत करण्यासाठी लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी चा एसटी स्टँड होता तिथे आता महाआघाडी शासनाच्या कार्यपद्धती चे प्रतीक म्हणून खंडहर दिसते.
ठप्प पडलेलं काम
गेली 2 ते अडीच वर्षे हे काम एक इंचाने वाढले नाही. निधी ची अपुरी तरतूद, नियोजन नियंत्रण याचा अनुभव,कंत्राटदाराने काम न करणे असले प्रकार चालू आहेत आणि वेठीला जनतेला धरण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी, असुविधा, व्यावसायिकांचे ही नुकसान
एसटी स्टँड नजीक च्या रस्त्यावर सातत्याने दोनवर्षं वाहतूक कोंडी सहन करतोय रत्नागिरीकर ,भर उन्हा पावसात उभे राहून गाड्यांची वाट पाहतायत रत्नागिरीतील ग्रामीण नागरिक,. स्टँड नजीक असलेले व्यापारी, हातगाडीवले, ऑटोरिक्षा वाले या सगळ्यांचा व्यवसाय धंदा कमालीचा घटलाय मात्र या कश्याच ही भान लोकप्रिय लोकप्रतिनिधींना ठेवायचं नाही.
गल्ली पासून मुंबई पर्यंत सत्ता पण प्रभावहीन
परिवहनमंत्री या जिल्ह्याचे पालक मंत्री. गल्ली पासून मुंबई पर्यंत सर्व सत्ता पद सत्ताधारी महाआघाडी कडे. तरीही रत्नागिरी एसटी स्टँड बांधून पूर्ण करण्याची मानसिकता आणि कुवत या सरकारकडे नाही.
जिल्हा नियोजन मधून निधी घ्यायचा होता तर इतका उशीर का?
मध्यवर्ती स्टँड बांधण्याची जबाबदारी कोणाची हे कदाचित विस्मृतीत गेलं असावं पुरेशी आर्थिक तरतूद न करण्यामागे काय राजकारण आहे? कोण कोणावर कुरघोडी करतोय.? आता जिल्हा नियोजन मधून निधी देणार असे वृत्त थडकत आहे. एसटी महामंडळाच्या स्टँड साठी नियोजन मधून निधी याचा अर्थ जिल्हा विकास योजनेतील निधी डायव्हर्ट होणार हे ओघाने आलेच. परत जिल्हा नियोजन चे अध्यक्ष पालकमंत्री तेच परिवहन मंत्री या बाबत काहीच बोलत नाहीत. आणि अद्याप हा जिल्हा नियोजन मधील निधी मंजूर झालेलाही नाही . जिल्हा नियोजन मधूनच हा खर्च करून स्टँड बांधायचा होता तर या आधी हा निधी का मंजूर करावा अस का वाटलं नाही? येथील नागरिकांना होणारा त्रास, होणारे हाल, व्यावसायीकांच होणार नुकसान , उन्हा तान्हात ताटकळणारे नागरिक यांची गंमत पाहण्यात सत्ताधीश मश्गुल आहेत अस म्हणावं का?
निद्रिस्त सत्ताधीशाना जागे करण्या साठी लाक्षणिक उपोषण
. या अकार्यक्षम सत्ताधार्यांना त्यांच्या सत्ते च्या कैफातून त्यांना जागे करावे या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून तात्काळ कार्यवाही साठी बाध्य करावे या साठी लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबणे आवश्यक झाले आहे
उपोषणाला उस्फुर्त प्रतिसाद देऊन आपली प्रतिक्रिया नोंदवण्याचे आवाहन
भूलथापा मृगजळी घोषणा एका बाजूला आणि प्रत्यक्ष ठप्प पडलेलं स्टँड च वास्तव दुसऱ्या बाजूला या वास्तवात बदल घडून उत्तम मध्यवर्ती एसटी स्टँड वेगाने उभा रहावा म्हणून भा ज पा रत्नागिरी चे कार्यकर्ते पदाधिकारी सकाळी उपोषणाला बसणार आहोत सोमवार दि. 28 मार्च रोजी सकाळी 10 .30 वाजता उपोषणाला प्रारंभ होईल सर्व त्रस्त नागरिकांनी उपोषण आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा रत्नागिरी ने केले आहे.

