दापाेली जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ३०लाख ७३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

९३ लाख रूपये किंमतीचे पाऊंड व वस्तु कुरियरने पाठवले आहेत ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून दापाेली जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ३०लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव येथील विजय खोत यांची जानेवारी २०२०मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हाट्सअपवर एक पार्सल पाठविले आहे असा मेसेज केला. पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सअपवर टाकलेत्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे, त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू व ९३ लाख रुपये किंमतीचे पाऊंड आहेत, असे सांगितले. त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती.
ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरून खोत यांनी त्यांच्याकडे मागणी केली जात होती तसे बँकेत पैसे भरले. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने खोत याना दोन एटीएम कार्डही पाठवली. या एटीएमद्वारे खोत यांनी २वेळा पैसेही काढले. या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल ३० लाख ७३हजार १०० रुपये या व्यक्तींनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले.
पैसे भरल्यानंतर देखील खोत यांना कुरियर काही आले नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे विजय खोत यांचे लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाणे गाठून अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांच्याविरोधात प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button