
हर घर तिरंगा मोहिमेत पोलिसांकडून विविध उपक्रम
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्या अंतर्गत येणार्या ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात जाज्वल्य देशाभिमानाने आणि उस्फूर्तपणे साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडूनही यात विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती डॉ. गर्ग यांनी दिली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बँड वाजवला जात असून यानिमित्ताने वातावरण निर्मिती केली जात आहे. त्याशिवाय 7500 सीसीटीव्ही कॅमेरे जिल्ह्यामध्ये बसवण्याचे उद्दिष्ट जिल्हा पोलीस दलाने या निमित्तानं निश्चित केलं होतं, त्यातील 1500 कॅमेरे जिल्ह्यात विविध ठिकाणी लागले असल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले. त्याशिवाय पोलीस विभागाच्या माध्यमातून 75 गरजू मुलांना सायकल वाटप तसेच 75 किलोमीटर धावणे आदी उपक्रम आयोजित केले आहेत.