एसटी बसस्थानकासाठी भाजपाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन

रत्नागिरी : एसटी बसस्थानकाचे काम गेली चार वर्ष रखडले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण व्हावे आणि झोपलेल्या लोकप्रतिनिधीना, शासनाला जाग येण्यासाठी व शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाने शक्तीप्रदर्शन करत लाक्षणिक उपोषण केले. मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. फक्त घोषणा करणाऱ्या मंत्र्यांच्या नावाने या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.

एसटी बसस्थानकाचे काम झालेच पाहिजे, या आघाडी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, परिवहनमंत्री अनिल परब हाय हाय, उदय सामंत हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

एसटी बसस्थानकाचे काम चार वर्षे रखडले आहे. जनतेचे प्रश्न, अडचणी पाहायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. त्यामुळे रत्नागिरीची दुर्दशा झाली आहे. उठसूठ घोषणा करायच्या, शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित नसताना फक्त वल्गना केल्या जात आहेत. हे सरकार झोपले आहे, त्याचा जागे करण्यासाठी उपोषण केले, असे भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचे २०१८ पासून काम सुरू झाले. पण २०२२ चे पण तीन महिने संपले तरीही एक इंच काम झालेले नाही. आजूबाजूच्या रिक्षा, टपरी व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. प्रवाशांचे हाल सुरू आहेत. वाहतुकीत अडथळे येत आहेत. परंतु ह्याचा कसलाही मुलाहिजा न ठेवता शासनकर्ते सत्ता उपभोगण्यात मग्न आहे, असा आरोप भाजपाने या वेळी केला.

अॅड. पटवर्धन यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी फक्त घोषणाबाजी करत आहेत.जिल्हा नियोजनमधून बसस्थानकासाठी निधी देता येतो का, असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामे करायची असतील तर हा निधी वापरता येतो. त्याचा पालकमंत्र्यांना अधिकार असतो. परंतु उठसूठ घोषणा केल्या जातात. जनतेच्या प्रश्नांना बगल देत सत्ता उपभोगत आहेत. शासन भ्रष्टाचारात गुंग आहे. रोज नवीन कारनामे उघड होत असून शासन व्यवस्था खिळखिळी झाली आहे. या जनतेचा शासनावर विश्वास नाही.

उपोषणात अॅड. पटवर्धन यांच्यासमवेत सचिन वहाळकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, अॅड. विलास पाटणे, डॉ. संतोष बेडेकर, उमेश खंडकर, संदीप सुर्वे, योगेश हळदवणेकर, राजू भाटलेकर, विजय पेडणेकर, नगरसेवक राजू तोडणकर, ऐश्वर्या जठार, नगरसेविका प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, तनया शिवलकर, सुखदा देव, विद्या गोखले, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, शिल्पा मराठे, डॉ. चंद्रशेखर केळकर, दिगंबर साठे, प्रमोद खेडेकर, ओंकार फडके, पिंट्या निवळकर, प्रभंजन केळकर, लिलाधर भडकमकर, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, विक्रम जैन, प्रवीण देसाई, नितीन जाधव, प्रा. प्रभाकर केतकर, राजन फाळके, महेंद्र मयेकर, राजीव कीर, शेखर लेले, रवींद्र इनामदार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री सामंत, परबांच्या नावाने घोषणा गाजल्या
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार उदय सामंत आणि पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या नावाने भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले .स्टॅंड रखडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू असल्याचे भाजपाने म्हटले आहे. सत्ताधीशांनी डोळे उघडे ठेवून जागृतावस्थेत येऊन बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा बसस्थानक नेटक्या स्वरूपात उभे राहिपर्यंत भाजपा आक्रमक पणे याचा पाठपुरावा करेल. जनतेची सोय सुविधा या बाबत औदासीन्य झटकून बसस्थानक उभारणी चा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी आक्रमक पणे करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button