
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर तिघांचा लैंगिक अत्याचार
शहरानजीकच्या मैदानात घडलेला प्रकार स्थानिकांच्या तक्रारीमुळे उघडकीस
रत्नागिरी : होळी पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला शहरानजीकच्या एका मैदानावर दुचाकीने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या तिघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मैदानाच्या बाजूला राहणार्यांनी हा अत्याचाराचा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांनाही अटक केली. गुरुवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही घटना 9 मार्च 2022 रोजी रात्री 11.30 वा.सुमारास घडली होती. तन्वीर वस्ता (वय 22, राहणार राजिवडा),अनिकेत प्रकाश नाखरेकर (वय 24, राहणार निवखोल, रत्नागिरी) आणि ॠषिकेश मधुकर टिकेकर (वय 22, राहणार निवखोल, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. यातील एकाने या मुलीला दुचाकीवरून शहरालगतच्या जंगलमय मैदानात नेले होते. त्यावेळी तिघांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी तिघांवरही लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.