चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला पेचात पकडले ,राणे यांनी उद्घाटनाची तारीख जाहीर केली

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला पेचात पकडले आहे,
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ बांधून तयार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.९ ऑक्टोबर २०२१ रोजी या विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्या दिवसापासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.याआधी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सात ऑक्टोबरला या विमानतळाचे उद्घाटन होणार असे जाहीर केले होते त्याला छेद देत नारायण राणे यांनी ही नवी तारीख जाहीर केली आहे
“९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहीजेत असं नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं. “क्रेडीट घेण्याचं प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती. सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या अडीच हजारात सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली होती. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नव्या तारखेची घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.याबाबत आता शिवसेना काय प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button