सोमय्या आला का? वैभव खेडेकर यांनी घातलेला कुर्ता चर्चेत

शिमगोत्सवाच्या अखेरच्या पर्वात म्हणजेच रंगमंचमीच्या दिवशी खेडमध्ये राजकीय शिमगा पहायला मिळाला. मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मंगळवारी खेडमध्ये रंगपंचमीनिमित्ति आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, व्हेरी गुड.. व्हेरी गुड.. सोमय्या आला का? आ आशयाचा घातलेला कुर्ता चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे शहरात रंगाची उधळण आणि राजकीय शिमगा देखील पहावयास मिळाला.
कथित ऑडिओ क्लिपमुळे, शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा व्हेरी गुड.. व्हेरी गुड.. हा शब्द चर्चेत आला. तर त्यांनी शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती (रसद) भाजपचे किरीट सोमय्या यांना पुरवली, असे आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि तत्कालीन खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुराव्यांसह केला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच घमासान उडाले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button