कशेडी घाटात मालवाहू ट्रकला अपघात ; चालक क्लिनर गाडीत अडकले

खेड। :महामार्गावरील अवघड कशेडी घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला दरडीवर आदळून अपघात झाला. या अपघातात ट्रकच्या केबिन मध्ये अडककेल्या चालक आणि क्लिनरला महत्प्रयासाने बाहेर काढुन रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी 1.30 च्या सुमारास घडला.
मुंबईहून गोव्याकडे जाणारा मालवाहू ट्रक कशेडी घाट उतरत असताना कशेडी आंबा येथील वळणावर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला दरडीवर आदळला. या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडले.
अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅप येथील वाहतूक पोलीस तसेच नरेंद्र महाराज संस्थांची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.
वाहतूक पोलिसांनी केबिनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकची केबिन चेपली गेल्याने आत अडकलेल्या दोघांना बाहेर काढताबा अडचणी येत होत्या. केबिनमध्ये अडकलेले दोघेही जीव वाचविण्यासाठी विनवण्या करत होते. मात्र पोलीस देखील त्यांना वाचविण्यात हतबल होते.
दरम्यान घटनास्थळी क्रेनला पाचारण करण्यात आले. क्रेन आल्यावर चेपलेली केबिन ओढून सरळ केल्यावर दोघानाहीं बाहेर काढण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्या या दोघांनाही कळबणी उप जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button