
फिशमिल धारकांचा बंद मागे
जीएसटीच्या मुद्यावरुन गेले महिनाभर देशभरात बंद असलेल्या फिशमिल व्यावसायिकांनी आपला बंद मागे घेतला असून नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे फिशमिल व्यावसायिकांसमोर निर्माण झालेली अडचण दूर होणार आहे. पूर्वी व्हॅटमध्ये फिशमिलला सवलत होती. २०१७ मध्ये जीएसटी प्रणाली आल्यानंतर २०१७ पासूनचा जीएसटी भरावा अशा नोटीसा फिशमिलधारकांना आल्या होत्या. फिशमिलधारकांनी ज्या कंपनीना प्रॉडक्टस् विकले होते त्यावेळी जीएसटी नसल्याने त्यांचेकडून जीएसटी घेण्यात आला नव्हता परंतु जर तो जीएसटी भरावा लागला असता तर तो काही कोटींच्या घरात गेला असता. यामुळे फिश ऑर्गनायझनतर्फे बंद पुकारण्यात आला होता. पूर्वीचा थकीत जीएसटी माफ करावा अशी आग्रही मागणी अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com