जागतिक पाणी दिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळेत जल जागृती सप्ताहाची सुरुवात
आज दिनांक 22 मार्च 2022 रोजी जागतिक पाणी दिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळेत जल जागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. मान.डॉ. श्री. बी. एन. पाटील जिल्हाधिकारी यांनी कार्यशाळेचे उद्घाटन जलकुंभाचे पुजन करुन केले. त्यानंतर जैविक FTK (फिल्ड टेस्ट किट) तसेच पाणी गुणवत्ता आपल्या हाती या घडीपत्रिकेचे (pocket chart) अनावरण मा.जिल्हाधिकारी व उपस्थित अन्य मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. मान.डॉ. श्री. बी. एन. पाटील जिल्हाधिकारी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शनपर बोलताना म्हटले की, पाण्याचा एक एक थेंब आपणाला स्वतः पासुन वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे निसर्ग जगेल साहजिकच आपण सजीव त्यामुळे जगू. या जागतिक पाणी दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेत मान. डॉ. श्री. बी. एन. पाटील जिल्हाधिकारी रत्नागिरी त्यांच्या समवेत श्री.परिक्षीत यादव अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.रत्नागिरी, श्री.अमोल भोसले प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता विभाग, जि.प. रत्नागिरी, श्री.डी.एस. परवडी कार्यकारी अभियंता, जि.प.रत्नागिरी, श्री.जगदिश पाटील कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग रत्नागिरी, श्री.बी.आर. टोणपे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा श्री.मंदार साठे युनिसेफचे प्रमुख वक्ते, श्री.जयंत देशपांडे, श्री.संदिप अध्यापक सल्लागार वाँटर फिल्ड इंडिया तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे सल्लागार/तज्ञ/ निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले.
www.konkantoday.com