
कोकण मार्गावरून धावणार्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या रचनेत ३ महिन्यांसाठी बदल
कोकण मार्गावरून धावणार्या निजामुद्दीन एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेससह चंदीगड-मडगांव गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेसच्या डब्यांच्या रचनेत ३ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आल्यााचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. त्यानुसार १२२८४/१२३८३ क्रमांकाच्या निजामुद्दीन-एर्नाकुलम दुरांतो साप्ताहिक एक्सप्रेस २९ जून ते ११ सप्टेंबर तर परतीच्या प्रवासात २ जुलै ते १ ऑक्टोबर या कालावधीत २ जनरेटर कारच्या जागी १ जनरेटर व १ एसएलआर डब्यांची धावणार आहे. १२४५०/१२४४९ क्रमांकाची चंदीगड-मडगाव गोवा संपर्कक्रांती द्विसाप्ताहिक एक्सप्रेसही १७ जून ते १७ सप्टेंबर तर परतीच्या प्रवासात १९ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत २ जनरेटर कारऐवजी एक जनरेटर व एक एसएलआर डब्यांची धावणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com