देवरुखच्या सोळजाई देवीची पालखी रविवारपासून घरोघरी
देवरूख : सोळजाई देवीची पालखी रविवारपासून घरोघरी दर्शनासाठी नेण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. सोळजाई मातेचा शिमगोत्सव सुरू झाला असून त्यातील शनिवारी सकाळी होम प्रज्वलित करण्यात आला. यानंतर ही पालखी शनिवारी दिवसभर देवळामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.
रविवारपासून प्रथेनुसार देवीची पालखी घरोघरी नेण्यास सुरुवात करण्यात आली. यात देवीचे प्रमुख मानकरी यांच्या घरी पालखी नेण्यात आली. यानंतर प्रत्येक घरोघरी पालखी घरोघरी दर्शनासाठी नेण्यात आली.