
स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला बँकॉ ब्लु रिबन प्रदान
स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला लोणावळा येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात निवृत्त सहकार अधिकारी मा कोकरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.200 कोटी ते250 कोटी ठेव गटात संस्थेला प्रथम क्रमांका चा बँकॉ ब्लु रीबन देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी अशोक नाईक श्री गुंडाळे उपस्थितीत होते. अँड.दीपक पटवर्धन अध्यक्ष तसेच मोहन बापट व्यवस्थापक यांनी हा सन्मान स्वीकारला.सलग 7 वर्ष वेगवेगळ्या गटात संस्थेला बँकॉ पुरस्कार प्राप्त होत आहे. संस्थेने केलेले नेटके शिस्तबद्ध ,सातत्यपूर्ण, विश्वासार्ह आर्थिक व्यवहार , उत्तम आर्थिक प्रमाणे आणि वाढते व्यवहार याचा विचार करून बँकॉ ब्लु रिबन ने स्वरूपानंद ला गौरवण्यात आले.
गौरव अधिकारी कर्मचारी पिग्मी प्रतिनिधी ना समर्पित
हा गौरव कोव्हिडं च्या कठीण काल खंडात ही सातत्यपूर्ण आर्थिकव्यवहार देणारे संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी याना समर्पित करतांना मला खूप आनंद होतो. उत्तम कामगिरी नंतर मिळणारे हे सन्मान सातत्यपूर्ण कामगिरी साठी प्रेरक आहेत. ही सांघिक प्रक्रिया आहे 41 हजार सभासदांच हे अर्थविश्व सर्वांच्या सहकार्याने अधिक अग्रेसर होईल अशी प्रतिक्रिया गौरव प्राप्त केल्या नंतर अँड दीपक पटवर्धन यांनी दिली.
