पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर -सासवड रस्ता वाहतुकीस बंद!

पुणे :* संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (२२ जून) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्यानिमित्त रविवारी मध्यरात्री दोननंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे. पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. रविवारी पहाटेपासून पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे.

श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठे‌वणार आहे. दोन्ही पालख्या नाना-भवानी पेठेतून लष्कर भागात येणार आहेत. तेथून पुणे-सोलापूर महामार्गाने हडपसर गाडीतळपर्यंत एकत्रित जाणार आहेत. गाडीतळ येथून सासवड रस्त्याने दिवे घाटमार्गे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड येथे रविवारी सायंकाळी मुक्कामी पोहोचणार आहे. श्री तुकाराम महाराज पालखी यांची हडपसर गाडीतळमार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर येथे मुक्कामी येणार आहे. मध्यरात्री दोननंतर टप्याटप्याने पालखी मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वाहतुकीस बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे – संत कबीर चौक ते बेलबाग चौक, संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल ते मम्मादेवी चाैक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक हाॅटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, मोरओढा ते भैरोबा नाला चौक, भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, सोलापूर रस्त्यावरील बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, रामटेकडी, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन) सीरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडीमशीन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत )

पोलिसांचे आवाहन

पालखी प्रस्थान मार्गावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाईपालखी प्रस्थानानंतर टप्याटप्याने वाहतूक पूर्ववतसासवडकडे जाणाऱ्या दिंडीतील वाहनांनी भैरोबा नाला, लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाटाचा वापार करावा.

वाहतूक नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक – ०२०-२६६८५००० किंवा २६६८४०००*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button