मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबानजीक अपघातात कापडगाव येथील महिला जागीच ठार

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्यानजीकच्या उतारात ट्रक, एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात कापडगाव येथील महिला सुमित्रा कोत्रे ही जागीच ठार झाली.
मुंबई- गोवा महामार्गावर
दर्ग्यानजीकच्या उतारात दुचाकीच्या पुढे एसटी बस असल्याने दुचाकीस्वार ( दुचाकी क्रमांक एम. एच. 08, ए .एल 1299) दीपक कोत्रे याने दुचाकीचा वेग कमी केला. याचवेळी मागून येणाऱ्या कर्नाटक येथील ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने समोर असलेल्या एसटी बसवर कोत्रे याची दुचाकी आदळली. या विचित्र अपघातात दुचाकीवर मागे बसलेली दीपकची आई सुमित्रा कोत्रे ही जागीच ठार झाली. दीपक कोत्रे हा जखमी झाल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. अपघातग्रस्त ट्रक हा कर्नाटकचा असून पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button