
असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत प्राप्त करायचा आहे- आदित्य ठाकरे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागा जिंकल्यानंतर युवा सेनेने मातोश्रीवर येऊन जल्लोष केला.युवासेनेच्या या विजयात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सामील झाले होते. या जल्लोषानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सिनेटच्या निवडणुकीत आपण करून दाखवलं आहे आणि विजय काय असतो हे काल आपण दाखवून दिलं आहे. 10 पैकी 10 निवडून आलो आता शांत बसणार नाही. ही सूरूवात आहे असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत प्राप्त करायचा आहे, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.