सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाटच्या दिशेने येत असलेली इर्टिका कार आग लागून खाक, कारमधील एका व्यक्तीचा जळून मृत्यू
कोल्हापूरकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाटच्या दिशेने येत असलेली इर्टिका कार अचानक आग लागून पूर्णत: खाक झाली. या कारमध्ये एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला.मात्र, ती व्यक्ती कोण याबाबतचे गूढ कायम आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वा.च्या सुमारास देवगड-निपाणी राज्यमार्गावर फोंडाघाटात वरच्या बाजूने खिंडीपासून काही अंतरावर एका वळणावर घडली. अपघाताची भीषणता एवढी होती की जळालेल्या व्यक्तीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याने त्या व्यक्तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. मात्र, ती गाडी कणकवलीतील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
ही कार गॅसकिटची होती. मात्र, सिलिंडरचा स्फोट झाला की शॉर्टसर्किट झाले याचे निश्चित कारण समजू शकले नाही. गाडीतील व्यक्ती कोल्हापूरकडून फोंडाघाटच्या दिशेने येत होती. फोंडा गावाकडून वर घाटात सुमारे दहा कि.मी. अंतरावर आणि खिंडीपासून खाली दोन कि.मी. अंतरावर या कारने पेट घेतला. कार पेटल्यानंतर चालकाने ती रस्त्याच्या बाजूलाही घेतली. मात्र, आगीचा भडका एवढा होता की त्यात एक व्यक्ती जळून मृत्युमुखी पडली.
www.konkantoday.com