लायन्स क्लब रत्नागिरी चे सेवाकार्य गौरवास्पद! प्रांतपाल एम जे एफ ला सुनील सुतार…वाचन कट्टा, पूर्णगड बस शेड, सिमेंट बेंचीस लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा…
लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना ही 104 वर्षांपासून सर्वात जुनी आणि जगात 50 हजार क्लब आणि 15 लाख सभासद संख्या असणारी जगाच्या कानाकोपऱ्यात 210 देशामध्ये सेवाकार्याकरिता कार्यरत असलेली संघटना ! पन्नास वर्षा पूर्वी 1973 साली कै भाई नलावडे आणि सहकाऱ्यांनी चालू केलेला हा क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवाकार्य करत असल्याने सुप्रसिद्ध आहे आणि दरवर्षी नूतन अध्यक्ष आणि त्यांची टीम त्यामध्ये विविध सेवाकार्य करून त्यामध्ये भर घालत असते ह्या कार्याची पहाणी करण्यासाठी प्रांतपाल क्लब ला अधिकृत भेट देत असतात ह्यावर्षी प्रांतपाल एम जे एफ लायन सुनील सुतार ह्यांनी क्लब ला भेट देऊन विविध सेवाकार्य चे उदघाटन तसेच सेवाकार्य पुरस्कारांचे वितरण केले
लायन्स आंतरराष्ट्रीय संघटने 3234 डी 1 चे प्रांतपाल ला सुनील सुतार दि 9 मार्च रोजी रत्नागिरी ला भेट दिली असता हातखंबा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले लायन्स क्लब च्या अध्यक्षा ऍड शबाना वस्ता खजिनदार ला. गणेश धुरी ह्यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते आणि खेडशी पासूनच सेवाकार्य उद्घाटनाचा धुमधडका सुरू झाला ला. शबाना वस्ता ह्यांच्या संकल्पनेतून लायन्स क्लब रत्नागिरी ने खेडशी महालक्ष्मी हायस्कूल येथे मुलांसाठी वाचन कट्टा ह्या अभिनव उपक्रमाचे प्रांतपाल ला सुनील सुतार ह्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले ह्या स्तुत्य उपक्रमाबद्धल गौरवउदगार काढून एका छोट्या मुलीला लायन्स ची पिन देऊन तिने काढलेल्या चित्रांचा कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सदस्यांच्या सर्व गाड्यांचा ताफा पूर्णगड येथे पोहचला या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी लायन्स क्लब तर्फे उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडचे गावचे सरपंच आणि ग्रामस्थांचे उपस्थित उद्घाटन करण्यात आले या महत्वपूर्ण उपक्रमांच्या उभारणीसाठी लायन्स क्लब रत्नागिरीचा अध्यक्ष अध्यक्षा लायन ऍड शबाना वास्ता यांनी विशेष प्रयत्न केले. प्रवासी निवारा करिता पूर्णगड येथील ग्रामस्थ अब्दुल्लाखान फडनाईक , प्रकाश पवार , अख्तर वाडकर , साई पावस्कर यांनी वस्तू रुपात व मनुष्यबळ स्वरूपात देणगी दिली तसेच हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम मान प्रांतपाल सुनील सुतार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला रत्नागिरीतील भाट्ये बीच हे पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या समुद्र किनारी पर्यटकांना सिमेंट बेंचीस उपयुक्त ठरतील हे लक्षात घेऊन पाच सिमेंट बेंचेस बसविण्यात आले .क्लब सदस्य लायन ला रवींद्र सुर्वे , अष्टगंध बिल्डर्स ह्यांनी त्या स्पॉन्सर केल्या. आणि ह्या सिमेंट बेंच चा लोकार्पण सोहळा प्रांतपाल ह्यांचे हस्ते करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता मान प्रांतपाल लायन्स हॉस्पिटल ला भेट देऊन कामकाजाबद्धल समाधान व्यक्त केले. कार्यकारणी सभेमध्ये भाग घेऊन क्लब च्या सर्व कागदपत्रांची पहाणी करण्यात येऊन समाधान व्यक्त केले. त्याच दरम्यान भडकंबा येथिल गरजू कु. जान्ह्ववी संजय शिंदे ह्या मुलीला शिलाई मशीन सुपूर्त करण्यात आले.हे शिलाई मशीन रत्नागिरी लायन क्लब चे सदस्य ला ओंकार नाचणकर यानी स्पॉन्सर केले .
सायंकाळी आठ वाजता सुरू झालेला मुख्य कार्यक्रमात लायन सेवा पुरस्कारानी अनेकांना सन्मानित करण्यात आले डॉ संतोष बेडेकर यांचे आई वडिलांचे स्मृती प्रित्यर्ध देण्यात येणारे लायन्स सामाजिक सेवा पुरस्कार रत्नागिरीतील विविध संस्था मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त1)गौरव सूर्यकांत नाखरेकर फणसवले2)जया भुपेश डावर 3) मिलिंद दिनकर वैद्य 4)सुनील शांताराम सुफल5) सुनील पुंडलिक कांबळे ह्यांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देण्यात आली. ला दत्तप्रसाद कुळकर्णी संपादक असलेल्या रत्नकेसरी ह्या मुखपत्राचे तसेच डॉ संतोष बेडेकर लिखित बालकांची काळजी व लसीकरण या परिपत्रकाचे प्रकाशन सन्माननीय प्रांतपाल ह्यांचे हस्ते करण्यात आले.दोन नवीन सभासद क्लब मध्ये निमंत्रित करण्यात आले सौ साक्षी गणेश धुरी आणि श्री वरुणकमलाकर पाटील ह्या नूतन सदस्यांना माजी प्रांतपाल लायन उदय लोध ह्यांनी शपथ देऊन त्यांना संघटनेत समावेशदेण्यात आला. लायन क्लब रत्नागिरी चे सदस्य एम जे एफ लायन चंद्रशेखर माने यांनी LCIF ला एक हजार डॉलरची देणगी दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला तसेच लायन्स क्लब च्या तीन सदस्यांनी LCIF ला प्रत्येकी एक हजार डॉलर ची देणगी देण्याची घोषणा केलेल्या लायन डॉ शैलेंद्र भोळे, ला. पराग पानवलकर, ला. यश राणे ह्यांचा प्रांतपाल ह्यांचे हस्ते लायन्स ची पिन देऊन सत्कार करण्यात आला. मागील वर्षी उत्कृष्ट कार्य केल्याबद्धल माजी अध्यक्षला श्रेया केळकर आणि इतर सदस्यांचा इंटरनॅशनल कडून आलेल्या पिन्स आणि पॅच देऊन गौरव करण्यात आला.शेवटी प्रांतपाल ला सुनील सुतार ह्यांनी मार्गदर्शन करून लायन्स क्लब रत्नागिरी च्या सेवाकार्याबद्धल गौरोउद्गगार काढून शुभेच्छा दिल्या. अनेक सदस्यांनी संघटनेसाठी दिलेल्या योगदानाबद्धल इंटरनॅशनल कडून आलेल्या पिन्स प्रदान करण्यात आल्या. शेवटी सचिव ला अभिजित गोडबोले ह्यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीत गाऊन स्नेहभोजनाने ह्यासर्वोत्कृष्ट अशा कार्यक्रमाची सांगता झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला श्रद्धा कुळकर्णी आणि लायन शिल्पा पानवलकर ह्यांनी उत्कृष्टपणे केले या कार्यक्रमा साठी माजी प्रांतपाल उदय लोध झोन चेअरमन प्रमोद खेडेकर लायन सदस्य, अनेक मान्यवर उपस्थित होते