घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरु आहे.पावणे दोन किलोमीटर लांबीच्या एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत कामे सुरु आहेत. हे दोन्ही बोगदे तयार करण्यासाठी खास मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बोगद्यांसाठी 502 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार आहे. कशेळी घाटातील वळणे अत्यंत धोकादायक आहेत. या घाटांमध्ये वारंवार अपघात होत असतात. आता नवीन बोगदे तयार झाल्याने कशेळी घाटातील अपघात होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तसेच या दोन्ही बोगद्यांमुळे कोकणवासियांचा प्रवास जलद होणार असून मुंबई आणि कोकण, गोव्याचे अंतर आणखी कमी होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात कशेडी घाटातील रस्त्यांचाही समावेश आहे. भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रूक असा हा महामार्ग आहे. या दोन्ही गावांच्या बाजूने पाच किलोमीटर अंतरावर दोन बोगदे तयार होत आहेत. त्यातील कशेडी ते भोगाव बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून वर्षभरात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button