रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
रत्नागिरी : जुनी पेशन, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता फरक यासह विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय कर्मचारी समन्वय समितीने राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासून कर्मचारी संपात उतरले होते. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसमोर प्रमुख संघटनांनी संपात सहभाग घेत निदर्शने केली. मात्र संप स्थगितीच्या सूचना आल्यामुळे दुपारनंतर कर्मचारी कार्यालयात हजर झाले. जिल्हा परिषदेतील सुमारे साडेतीनशेहून अनेक कर्मचारी सहभागी होते. एप्रिलपर्यंत राज्य सरकारने जुन्या पेन्शन इतर सर्व मागण्यांबाबत दिलेला शब्द पाळला नाही तर समन्वय समिती मे महिन्यापासून बेमुदत संपावर जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.