कोकण रेल्वे मार्गावर अजुन ऐक विशेष पार्सल ट्रेन धावणार

कोकण रेल्वे मार्गावर अजुन ऐक विशेष पार्सल ट्रेन ओखा ते तिरुवनंतपुरम सेंट्रल अशी धावणार आहे.ही ट्रेन पश्चिम  रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहे.या ट्रेनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाणार आहे.विशेष पार्सल ट्रेन नंबर 00933 ही ओखा वरून मंगळवारी  05/05/2020 ला 13.10 Hrs ला सुटेल.ही गाडी दुसऱ्या दिवशी 06/05/2020 ला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर 11.10 Hrs,कणकवली स्थानकावर 13.40Hrs, मडगांव जंक्शन स्थानकावर 16.50Hrs आणि उडपी स्थानकांवर 21.10Hrs ला येणार आहे. ही गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी 07/05/2020 12.00Hrs ला येणार आहे.तसेच या गाडीची परतीची गाडी नं 00934 ही तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरून 07/05/2020 ला 23.00Hrs सूटेल व 08/05/2020 ला उडपी स्थानकावर 13.20 Hrs,मडगांव जंक्शन स्थानकावर 18.10Hrs, कणकवली स्थानकावर 20.50Hrs,रत्नागिरी स्थानकावर 23.10 Hrs ला येणार आहे.ही गाडी ओखा स्थानकांवर तिसऱ्या दिवशी 09/05/2020 ला 21.40Hrs पोहोचणार आहे.ही गाडी रामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद,आनंद,वडोदरा,भारूच,सुरत, वसई रोड,पनवेल,रोहा, रत्नागिरी,कणकवली,मडगाव जंक्शन,उडपी,मेंगळूर जंक्शन, कन्नूर, केलीकट, शोरनूर जंक्शन,त्रिसूर,एर्नाकुलम टाऊन, कोट्याम,कोल्लम जंक्शन या स्थानकांवर व्यावसायिक थांबा घेणार आहे.वरील स्थानकांवर जर आपल्याला आपले पार्सल पोहोचवायचे असल्यास आपण रत्नागिरी,कणकवली, मडगाव जंक्शन,उडपी या स्थानकावरील पार्सल ऑफिसशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button