
कोकण मार्गावरून धावणार्या नेत्रावतीमध्ये जागेवरून दोन गटात राडा.
कोकण मार्गावरून धावणार्या एलटीटी-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेसच्या जनरल डब्यात जागेवरून शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास येथील स्थानकात दोन गटात राडा झाला. एका प्रवाशाला इतर चार प्रवाशांनी पनवेल स्थानकात केलेल्या मारहाणीचे पडसाद येथे उमटले. या गोंधळामुळे एक्सप्रेस अर्धा तास खोळंबली. या प्रकरणी दोन्ही गटातील १० जणांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.www.konkantoday.com