
रत्नागिरी उपपरिसराच्या साक्षी चाळकेला युवा महोत्सवात सुवर्णपदक
युवा महोत्सवात उपपरिसराचा प्रथमच सहभाग, पदार्पणातच सुवर्ण पदक
रत्नागिरी- चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठ उपपरिसरच्या विद्यार्थिनी साक्षी चाळकेनं स्टोरी टेलिंगमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक पटकावलंय…मुंबई विद्यापीठाचा 54 वा युवा महोत्सवात साक्षी चाळके हिनं हे यश संपादन केलंय…तर इलॉकेशन अर्थात वक्तृत्व स्पर्धेत ऋजुदा जाधव हिला उत्तेजनार्थ बक्षीस देवून गौरवण्यात आलंय… मुंबई विद्यापिठाच्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे संपन्न झाली… प्रथमच युवा महोत्सवात रत्नागिरी उपपरिसराच्या विद्यार्थ्यांनी सात प्रकारात सहभाग नोंदवला होता…
या विद्यार्थ्यांना तांत्रिक सहकार्य हे रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचं लाभलं असून डॉ आनंद आंबेकर यांचं देखील सहकार्य ह्या विद्यार्थ्यांना लाभलंय..तसेच तांत्रिक मार्गदर्शन शुभम पांचाळ यांनी केलं.. रत्नागिरी उपपरिसराचे प्रमुख डॉ किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाचे प्रा निलेश रोकडे, प्रा. आरती दामले आणि प्रा अश्विनी जाधव यांचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलं…