
गणेशोत्सव कालावधीत मुंबई- चिपळूण गणपती स्पेशल चालवून दिलासा द्यावा
गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर आहेत. आरक्षित तिकिटे न मिळाल्याने गावी जायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे.यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मुंबई- चिपळूण गणपती स्पेशल चालवून दिलासा द्यावा, अशी मागणी मराठा ९६ कुळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे.www.konkantoday.com