नोंदणी विभाग पक्षकारांसाठी दस्ताचे नमुने उपलब्ध करून देणार.

पक्षकारांना एखादा दस्तऐवज दुय्यम निबंधकांकडे नोंदवून घ्यायचा असेल तर तो दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घ्यावी लागते. परंतु यापुढे नोंदणी विभागच दस्तांचे नमुने पक्षकारांना उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे वेगळ्या तज्ञाची मदत न घेता पक्षकार दस्त तयार करू शकतील आणि त्याची नोंदणी सोयीची होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी नोंदणी विभागातील उच्च पदस्त अधिकारी उपमहानिरीक्षक व सहजिल्हा निबंधक यांची एक कार्यशाळा नुकतीच पुणे येथे घेतली. त्यावेळी खात्याकडून करण्यात येणारे प्रस्तावित बदल कोणते असतील त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर शंका, समाधानदेखील करण्यात आले.

यापूर्वी कुलमुख्यारपत्र संबंधित व्यक्तींना उपलब्ध करून दिले जात होते. नवीन कायद्यानुसार हा दस्तऐवज सार्वजनिक केला जाणार आहे. दस्त नोंदणीच्यावेळी ओळख पडताळणीसाठी आधारप्रणालीचा वापर केला जाणार आहे. केंद्रीय स्तरावर हा कायदा बदल प्रस्तावित असून लवकरच तो देशभरात लागू होईल. नवीन मसुद्यात डिजिटल नोंदणी आधार पडताळणी, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड यासारख्या तरतूदी समाविष्ट आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button