
कोकणात घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या चिऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या चिरेखाणी सुरू करायला परवानगी मिळाली
कोकणात घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या चिऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या चिरेखाणी सुरू करायला परवानगी मिळाली आहे, अशी माहिती चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिली.
केंद्र शासनाकडून आलेल्या आदेशानुसार गौणखनिज म्हणून अधिसूचित केलेल्या ३१ गौणखनिजांच्या खोदाईला परवाने देणे बंद करण्यात आले होते. त्यामध्ये कोकणातील चिरेखाणींचा समावेश होता. या बंदीमुळे कोकणात घरबांधणीसाठी अत्यावश्यक चिरा जांभा दगड खाणींना परवानगी देणे बंद झाले होते. आमदार शेखर निकम यांनी गेला महिनाभर पाठपुरावा केल्याने रत्नागिरी आणि जिल्ह्यात चिरेखाणींना परवानगी देण्याचा आदेश आज महसूल विभागाकडून देण्यात आला.
www.konkantoday.com




