
जिल्ह्यात माघी गणेशोत्सवास प्रारंभ; गणपतीपुळे येथे भक्तांची मांदियाळी
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी विविध भागात गणरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना विविध मंडळांनी केली आहे. गणेश मंदिरांमध्येही पाच ते सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणपतीपुळे येथील मंदिराला या उत्सवानिमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी गणपतीपुळे येथेही कोरोनाचा निर्बंधांचे पालन करीत भाविकांनी दर्शन घेतले.
पावसनजीकच्या गणेशगुळे येथील प्रसिध्द गणेश मंदिरातही भाविकांनी दर्शन घेतले. रत्नागिरी शहराजवळच्या भाट्ये झरी विनायक मंदिरातही महाप्रसादासह भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.