दारुबाबत केलेल्या वक्तव्यावर कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली

दारुबाबत केलेल्या वक्तव्यावर कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हणत त्यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर अखेर सांयकाळी इंदापूर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफीनामा सादर केला.
बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीका केली जात होती. अखेर त्यांनी या प्रकरणी नरमाईची भूमिका घेत माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बंडातात्या म्हणाले की, ‘मी ज्यांच्याबद्दल बोललो त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे माझे वक्तव्य जर चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कसला कमीपणा? माझ्या वक्तव्याचं पत्रकारांनी भांडवलं केलं, आता विषय वाढवू नये.’
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button