सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने जळून खाक

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. ही घटना आज गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
मनिष ट्रॅव्हल्स (नं. जीए ०३/डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली असता बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. या बसमधील प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले व बसने मोठा पेट घेतला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button