रत्नागिरीचा कचराप्रश्‍न नगर परिषद निवडणुकीपूर्वी पेटण्याची शक्यता

रत्नागिरी : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प शिवसेनेसाठी अडचणीचा विषय ठरण्याची शक्यता आहे. दांडेआडोम या ठिकाणी घनकचरा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने नगर परिषदेची बाजू योग्य ठरवली. प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक 7 कोटी 93 लाख रूपयांचे आहे. त्यापैकी 5 कोटी रूपये रत्नागिरी नगर परिषदेला प्राप्‍तही झाले आहेत. सरकारी 6 एकर जमीनही मोफत मिळाली आहे. येथे सुमारे 1 ते दीड कोटी रूपये खर्चून संरक्षक भिंतसुद्धा घालण्यात आली आहे. शहरवासियांच्या हिताचा हा प्रकल्प होण्यासंदर्भात पुढील कार्यवाही का होत नाही? असा सवाल सध्या शहरातून उपस्थित होत आहे. रत्नागिरी शहरात दररोज सुमारे 22 टन कचरा जमा होतो. सध्या हा कचरा साळवीस्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ टाकला जात असून, त्यावर खत प्रक्रिया केली जात आहे. शहराची लोकसंख्या 1 लाखाच्या वर गेली असावी, असा अंदाज आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी असतानाही त्याबाबतची निविदा प्रक्रिया थांबली आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी निवडणुकीपूर्वी सुवर्णमध्य काढण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा विषय शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button