आज एसटी विलिनीकरणावरील अहवाल न्यायालयापुढे ठेवण्यात येणार?
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यापासून संप पुकारला आहे.मुंबई उच्च न्यायालयान यासंदर्भात उच्च स्तरीय त्री सदस्यीय समितीची स्थापना करून विलीनीकरणावर अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयानं 12 आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्फत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी 12 आठवड्याची मुदत संपत आहे. राज्य सरकारकडून आज एसटी विलिनीकरणावरील अहवाल न्यायालयापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
.www.konkantoday.com