राष्ट्रपती रामनाथ कोविंद 12 फेब्रुवारी रोजी येणार मंडणगड-आंबडवेत

रत्नागिरी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 12 फेब्रुवारी रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळगावास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या तयारीकरिता प्रशासकीय स्तरावर युध्दपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंडणगड शहरापासून चार किलोमीटर लांबीवर असलेल्या शिरगाव येथील मोकळ्या मैदानात पक्क्या डांबरीकरण केलेल्या हेलिपॅड निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दौऱ्यानिमित्त लोणंद-आंबडवे या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात केली आहे. मंडणगड तहसील कार्यालय व पोलिस प्रशासन या निमित्ताने अधिक कार्यक्षम झालेले दिसून आले असून विभागीय पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांनी मंगळवारी आंबडवे गावाचा दौरा केला. दौऱ्याच्या तयारीसाठी येथील प्रशासकीय यंत्रणा कामास लागल्याचे दिसून येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button