रत्नागिरी तालुका फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर असोसिएशन चां सिनेमॅटोग्राफी वर्कशॉप उत्साहात संपन्न
रत्नागिरी.. व्हिडीओग्राफर बदलत्या काळानुसार अपडेट रहावा आणि त्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने रत्नागिरी तालुका फोटोग्राफर,व्हिडीओग्राफर असोसिएशन च्या वतीने 29,30 जानेवारी या दोन दिवशी सिनेमॅटोग्राफी [ शुट लाईक अ प्रो] हा वर्कशॉप घेण्यात आला.या वर्कशॉपमध्ये प्रमुख मार्गदर्शक दिगंबर कोळेकर सर [ अक्षता फिल्म] ,किरण बामणे हे उपस्थित होते.
या वर्कशॉपमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे प्रारंभी 21 फोटोग्राफर ना या वर्कशॉपमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली.यामध्ये कोळेकर सरांनी सिनेमॅटोग्राफी साठी लागणा-या कॅमेरा सेटींग, कॅमेरा ॲंगल,गिंबल ऑपरेटिंग असे वेगवेगळे प्रकारचे लाईटचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करून प्रत्यक्ष मॉडेल सह प्रत्येक फोटोग्राफर ला स्वतः च्या कॅमेरा वर शुटिंग करायला लावून त्यातील होणारे प्रत्यक्ष बदल अनुभवायला दिले व मार्गदर्शन केले.या वर्कशॉपमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाने स्वतःहून सहभाग घेतला होता आणि तो मुलगा म्हणजे मंथन कांचन मालगुंडकर.
हा वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी तालुका असोसिएशनचे सचिन सावंत,किरण खेडेकर, कांचन मालगुंडकर , गुरु चौगुले, श्वेता बेंद्रे, संदेश पवार,दिनेश भातडे,द्मानेश कांबळे,ओमकार धातकर व संपूर्ण तालुका असोसिएशनचे सभासद यांनी परिश्रम घेतले.
यापुढे काळाची गरज बघून फोटोग्राफर प्रशिक्षणाने सम्रुध्द व्हावा यासाठी वेगवेगळ्या विषयांवर रत्नागिरी फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर असोसिएशन वर्कशॉप घेणार असून जिल्ह्यातील फोटोग्राफरना त्याचा फायदा होणार आहे.
www.konkantoday.com