
पतंजलि योग समिती व परिवार रत्नागिरीतर्फे उद्या जागतिक योग दिन.
रत्नागिरी : योगऋषी स्वामी रामदेव महाराजांच्या आशीर्वादाने संचलित पतंजलि योग समिती व परिवार रत्नागिरी यांच्या विद्यमाने उद्या (२१ जून) जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ या वेळेत माळनाका येथील बँक्वेटस् हॉलमध्ये (विवेक हॉटेल मागे) हा कार्यक्रम होईल. योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. या भारतीय प्राचीन परंपरेचा व संस्कृतीचा सर्व देशांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा यासाठी अनेक भारतीयांनी अहर्निश कार्य केले असून, त्यामध्ये योगऋषी प.पू. रामदेवजी महाराजांचे नाव अग्रभागी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस दरवर्षी सर्व देशांमध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि योगाभ्यासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला पतंजलि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. रमा जोग, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी मारुती अलकुटे, किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत, पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग, युवा भारतचे जिल्हा प्रभारी ब्रिजेश पटेल, महिला पतंजलि योग समितीच्या जिल्हा प्रभारी सौ. हर्षदा डोंगरे यांनी केले आहे.