गणपतीपुळे येथे स्वयंभू “श्रीं” च्या मंदिरात उद्यापासून माघी गणेशोत्सव!

श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्यामार्फत दि. २ ते शनिवार दि. ५ फेब्रुवारीपर्यंत माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. उद्या माघ शुद्ध प्रतिपदा आहे. माघ पंचमीला उत्सवाची सांगता होणार आहे.

दिनांक 2 फेब्रुवारीला सकाळी पंचसूक्त सहित महापूजेद्वारे उत्सवास प्रारंभ होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रम म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीदिनी सहस्त्र मोदक अर्पण म्हणजेच सहस्रनाम, प्रतिदिन सायंकाळी साडेसात ते रात्र साडेनऊ वाजता किर्तन होणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी ललिताच्या कीर्तनाने माघी गणेशोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. माघी गणेशोत्सव हा कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे व अटींचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात येणार आहे. या उत्सवाचे नियोजन संस्थान श्रीदेवी गणपतीपुळे यांचेमार्फत करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
www.konkabtoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button